14 April, 2024
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे यांच्या देखरेखीमध्ये मतदार यादीचे काम जोरात सुरू
हिंगोली (जिमाका), दि. 14 : सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी तहसील कार्यालयातील सभागृहात मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला. यावेळी नायब तहसीलदार वैभव पवार उपस्थित होते.
या बैठकीत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने उमरखेड तहसील कार्यालय येथील सभागृहामध्ये मतदान याद्याचे कामकाजाचा आढावा घेण्यात आला. 15-हिंगोली लोकसभा मतदार संघात 82-उमरखेड विधानसभा मतदार संघ समाविष्ट आहे. या मतदार संघातील मतदार यादीचे कामकाज जोरात सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.
82-उमरखेड विधानसभा मतदार संघातील लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शांततेत व पारदर्शकपणे पार पाडावी. यासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर न ठेवता दक्ष राहण्याचे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे यांनी केले.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment