03 April, 2024

निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती एम. एस. अर्चना यांची नियुक्ती

हिंगोली (जिमाका), दि. 03 : भारत निवडणूक आयोगाने 15-हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी श्रीमती एम. एस. अर्चना यांची निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचे आज बुधवारी सायंकाळी हिंगोली शासकीय विश्राम गृह येथे आगमन झाले आहे. श्रीमती एम. एस. अर्चना या कर्नाटक केडरच्या असून, त्यांचा संपर्क क्रमांक 8263833541 आहे. त्या सायंकाळी 5 ते 7 वाजेदरम्यान हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध असतील. कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार, नागरिक किंवा मतदाराची तक्रार असल्यास वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर यांनी कळविले आहे. *******

No comments: