04 April, 2024

निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती एम.एस. अर्चना यांच्याकडून स्ट्राँग रुम, मतमोजणी केंद्राची पाहणी

हिंगोली (जिमाका), दि. 04 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती एम. एस. अर्चना यांनी आज लिंबाळा मक्ता येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात असलेल्या स्ट्राँगरूमची पाहणी केली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. पी. बी. देवसरकर, संपर्क अधिकारी सुनील शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता गजानन खोरणे उपस्थित होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी निवडणूक निरीक्षक श्रीमती अर्चना यांनी आज येथील स्ट्राँग रुम, मत मोजणी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. हिंगोली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक २६ एप्रिल २०२४ रोजी होत असून, मतमोजणी ४ जून २०२४ रोजी होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निवडणुकीसंदर्भात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या अनुषंगाने श्रीमती अर्चना यांनी येथील स्ट्राँग रुमची पाहणी करून आढावा घेतला. तसेच मतमोजणी वेळी माध्यम कक्ष स्थापन करण्यात येणार असलेल्या जागेचीही त्यांनी पाहणी केली. निवडणूक निरीक्षक श्रीमती अर्चना यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे स्ट्राँगरूममध्ये सर्व व्यवस्था आहे का याबाबत पाहणी केली. तसेच विद्युत शॉर्ट सर्कीटमुळे मतदानयंत्रांना हानी होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी सूचना दिल्या. त्यांनी सीसीटीव्ही यंत्रणा, अग्नीरोधक यंत्रणा, डबल-लॉक सिस्टीम व परिसरातील सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली. याठिकाणी सिसिटीव्ही, सुरक्षा अलार्म, अग्निशामक यंत्रणा व पुरेसे विद्युत दिवे यांची पाहणी केली. श्रीमती एम. एस. अर्चना यांनी मत मोजणी केंद्रावर स्वच्छतेसह इतर सर्व आवश्यक पायाभूत सुविधेसोबतच उन्हापासून बचावासाठी शेड व पिण्याच्या पाणी या दोन सुविधा प्रामुख्याने उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ******

No comments: