25 April, 2024
निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांच्याकडून पुसेगाव, पहेनी येथील मतदान केंद्राची पाहणी
हिंगोली (जिमाका), दि. 25 : हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वसमत, हिंगोली आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांनी आज हिंगोली विधानसभा मतदार संघातील पुसेगाव, पहेनी येथील मतदान केंद्राना भेट देऊन पाहणी केली.
यावेळी निवडणूक निरीक्षकांसोबत सहायक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, शिवाजी रोडगे, शेख मुजीब, पोलीस पाटील राधेशाम जैस्वाल उपस्थित होते.
हिंगोली लोकसभा मतदार आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रावर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सावलीसाठी शामियाना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रॅम्पची सुविधा, व्हील चेअर, दिव्यांग व्यक्तींसाठी पूरक सेवा जसे प्रथमोपचार, दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी सक्षम ॲपवर नोंदणी यासह आवश्यक त्या सर्व सुविधांची माहिती श्री. अन्वर अली यांनी घेतली.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment