17 April, 2024
सूक्ष्म निरीक्षकांच्या द्वितीय प्रशिक्षणात कार्य, जबाबदारी आणि कर्तव्याबाबत सविस्तर मार्गदर्शन
हिंगोली (जिमाका), दि. 17 : 15-हिंगोली लोकसभा मतदार संघांतर्गत 92- वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघातील सूक्ष्म निरीक्षकांचे द्वितीय प्रशिक्षण नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात सामान्य निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, प्रशिक्षणाचे नोडल अधिकारी डॉ. दीपक साबळे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. यावेळी सूक्ष्मनिरीक्षकाचे कार्य, जबाबदारी आणि कर्तव्य याबाबत पीपीटीच्या साह्याने सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणाच्या शेवटी सामान्य निवडणूक निरीक्षक एम. एस. अर्चना यांनी सूक्ष्म निरीक्षक यांच्या कामाचा आढावा घेऊन आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना केल्या. तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सूक्ष्म निरिक्षकांना त्यांचे कर्तव्य व जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सूक्ष्म निरीक्षक यांनी कर्तव्य बजावत असताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नांची उत्तरे देऊन शंका समाधान करण्यात आले.
या प्रशिक्षणास 118 सूक्ष्म निरीक्षक उपस्थित होते. प्रशिक्षक म्हणून अमोल निळेकर, चंद्रकांत धुमाळे. बजरंग बोडके, विजय बांगर, अरुण बैस आणि बालाजी काळे यांनी काम पाहिले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment