09 April, 2024
जिल्हास्तरीय बैठकीत आरोग्य विभागाचा आढावा
हिंगोली (जिमाका), दि 09: जिल्हा प्रशिक्षण संघ सामान्य रुग्णालय हिंगोली येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनिल देशमुख यांनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, तालुका स्तरावरील कार्यक्रम सहाय्यक, डाटा ऑपरेटर व आरसीएचचे काम पाहणारे कर्मचारी यांची दि. 8 एप्रिल, 2024 रोजी आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले.
या बैठकीत नियमित लसीकरण, गरोदर मातांची शंभर टक्के नोंदणी व सर्व प्रकारच्या तपासण्या, आरसीएच पोर्टल, एचएमआयएस, एनसीडी, Uwin ॲप, जेएसवाय, सिकलसेल, प्रधान मंत्री मातृत्व वंदना योजना, साथरोग, कुटुंब कल्याण शिबीर, प्रोढांना बीसीजी लसीकरण अशा विविध विषयावर सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, वैद्यकीय अधिकारी डॉ. महाले, अमोल कुलकर्णी, मुनाफ, मुनेश्वर, मंचक पवार, उद्धव थिटे, पारडकर, नरेश पत्की, जिल्हास्तरीय अधिकारी, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक, तालुकास्तरीय पर्यवेक्षक, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, तालुका स्तरावरील कार्यक्रम सहाय्यक, डाटा ऑपरेटर व आरसीएचचे काम पाहणारे कर्मचारी उपस्थित होते.
********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment