दि. १४ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत शिरडशहापूर येथे झालेल्या मासिक सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एन. रामपुरे यांनी संभाव्य दुष्काळी परिस्थितीत जनावरांची घ्यावयाची काळजी, पशुधनासाठी चाऱ्याचे नियोजन आणि उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर याबाबत सविस्तर माहिती दिली.
लक्ष्मण नाईक तांडा येथे राबविण्यात आलेल्या अभियानांतर्गत निकृष्ट चारा सकस करण्यासाठी सोयाबीनच्या गुळीवर युरिया प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच कमी खर्चात आणि उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून पशुधनासाठी पोषक चारा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने मुरघास निर्मिती, हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्पादन आणि अझोला निर्मिती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पशुपालकांनी संभाव्य चारा टंचाईचा विचार करून आतापासूनच चारा व्यवस्थापनाचे नियोजन करावे, उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने वापर करावा आणि पर्यायी चारा उत्पादनाच्या पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच सध्या सुरू असलेल्या व्हीएमडीडीपी योजनेंतर्गत जास्तीत जास्त पशुपालकांनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असेही सांगण्यात आले.


No comments:
Post a Comment