राष्ट्रीय लोकअदालतीचे 12 नोव्हेंबर रोजी आयोजन
• परस्पर सामंजस्याने
तडजोडीद्वारे निकाली काढण्याची संधी
हिंगोली (जिमाका), दि. 11 : येथील जिल्हा न्यायालयात व त्या अंतर्गत येणाऱ्या
विविध न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार,
दिनांक 12 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोकअदालतीचे
आयोजन करण्यात आले आहे.
या
लोकअदालतीमध्ये भूसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तडजोड युक्त फौजदारी
प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, वैवाहिक/ कौटुंबिक वाद प्रकरणे, पराक्रम्य अभिलेख अधिनियमचे
कलम 138 खालील प्रकरणे, नगर परिषद, विद्युत महावितरण कंपनी, बँक व पतसंस्थांचे वादपूर्व
प्रकरणे इत्यादी खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत. ही सर्व प्रकरणे आपआपसातील परस्पर सामंजस्याने तडजोडीद्वारे
निकाली काढता यावीत. यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय
लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकार मंडळींनी उपस्थित राहून फायदा घ्यावा, असे आवाहन
जिल्हा न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर. व्ही. लोखंडे, वकील संघाचे
अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment