जिल्हा ग्रंथालयात दिवाळी अंक
प्रदर्शनाचे उद्घाटन
हिंगोली (जिमाका), दि. 07 : जिल्हा ग्रंथालय
अधिकारी कार्यालय हिंगोली येथे दि. 07 ते 09 नोंव्हेंबर या कालावधीत दिवाळी मध्ये प्रकाशित
झालेल्या विविध दिवाळी अंकाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे
उद्घाटन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगरे हिंगोली यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी
जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, अशोक अर्धापुरकर, रामभाऊ पुनसे, वाचक व ग्रंथालय
पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रदर्शनात सुमारे 125 पेक्षा अधिक दिवाळी
अंक उपलब्ध असून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका हिंगोली
येथे सर्वांसाठी खुले आहेत. या दिवाळी अंक प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन
जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment