अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचतगटांनी
मिनी ट्रॅक्टरसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 18 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 8 मार्च, 2017 च्या
शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना
मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांना पुरवठा करणे ही योजना सुरु करण्यात आलेली
आहे.
या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन
स्तरावर निश्चित करण्यात आलेले आहे. उपरोक्त शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.
या योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यातील
इच्छूक पात्र बचतगटांनी आपला अर्ज दि. 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत सहाय्यक आयुक्त,
समाज कल्याण, हिंगोली या कार्यालयात संबंधित शाखेस सादर करावा, असे आवाहन शिवानंद
मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment