निदेशक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली
(जिमाका), दि. 28 : वसमत येथील
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणानार्थ्यांना
‘एम्प्लॉयबिलिटी स्कील’ या विषयाची तासिका घेण्यासाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात
11 महिने कालावधीसाठी मानधन तत्वावर निदेशकाची नेमणूक करावयाची असल्याने पात्र उमेदवाराकडून
अर्ज मागविण्यात येत आहेत.
पात्र उमेदवारांनी दिनांक 10 डिसेंबर, 2022 पर्यंत
आपला बायोडाटा किंवा अर्ज मूळ शैक्षणिक कागदपत्रासह औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत
जि. हिंगोली येथे सादर करावेत. शैक्षणिक पात्रता
व इतर अधिक माहितीसाठी www.dgt.gov.in
या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्राचार्य,औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वसमत
जि.हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
*****
No comments:
Post a Comment