अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिभाशाली
व वैविध्यसंपन्न लेखन
- भ.मा.परसावळे
हिंगोली (जिमाका), दि. 20 : अण्णाभाऊ साठे यांनी शोषित, कामगार वर्गासाठी काम
केले आहे. अण्णाभाऊ साठे यांनी भाषेचे लालित्य कमावले आहे. ते प्रतिभाशाली व
अत्यंत वैविध्यसंपन्न लेखन आहे. अण्णाभाऊ साठे हे उपजत लेखक असल्याने त्यांच्या
लेखनात संवेदनशीलता आहे. त्यांच्या लेखनामध्ये मुक्त आविष्कार आलेले आहेत. तसेच
बापटांच्या कविता या प्रबोधनाच्या कविता आहेत. भाषेचा वापर कसा करतो त्यावर त्याची
अभिजातता अवलंबून आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भ. मा. परसावळे यांनी
यावेळी केले.
येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात
हिंगोली ग्रंथोत्सव-2022 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी
भ.मा.परसावळे यांच्या अध्यक्षतेखाली अण्णाभाऊ साठे व वसंत बापट यांच्या
जन्मशताब्दी निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रा. संध्या रंगारी यांनी अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवादी
चळवळीतून प्रेरणा घेत लेखन केले आहे. त्यांनी कादंबऱ्या, कथा,गाणे असे विपूल
प्रमाणात लेखन केले आहे. अण्णाभाऊ हे मानवतावादी भूमिका घेऊन लेखन केले आहे.
अण्णाभाऊचे लेखन हे त्यांच्या अनुभवातून आलेले आहे. अण्णाभाऊचे लेखन सर्वसमावेशक आहे.
फकिरा ही त्यांची कादंबरी अत्यंत गाजलेली असल्याचे सांगून त्यांनी अण्णाभाऊ साठे
यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न त्यांच्या व्याख्यानातून केला आहे.
मराठी साहित्याला कलाटणी देणारे वसंत बापट यांचे कवितासंग्रह आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या उत्थानासाठी त्यांनी पोवाडा, शाहिरीच्या माध्यमातून कार्य
केले आहे. नव्या युगाचे पोवाडे लिहिले आहेत. नवयुवकांना चेतना देणारे साहित्य
निर्माण केले आहेत. भाषेचे संवर्धन, अभिवृध्दी होण्यासाठी प्रत्येक घटक लिहिता
झाला पाहिजे. मानवतावादी दृष्टीने लिहिणारे साहित्यिक आहेत. त्यांच्या विचारातून
मार्गक्रमण करणे गरजेचे असल्याचे सांगून त्यांच्या जीवनावर व साहित्यावर प्रकाश
टाकण्याचे काम व्याख्यातून प्रा. महेश मंगनाळे यांनी केले आहे.
या व्याख्यानाचे सूत्रसंचालन प्रा. संगीता मुंढे यांनी केले. तर आभार
प्रदर्शन कल्याण वसेकर यांनी केले. या व्याख्यानास जिल्ह्यातील सार्वजनिक
वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment