16 November, 2022

 

नशामुक्त भारत अभियानांतर्गत भव्य व्यसनमुक्ती चित्र प्रदर्शनी

 कार्यक्रमाचे आयोजन

            हिंगोली (जिमाका), दि. 16 :  भारत सरकार सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली व आयुक्तालय, समाज कल्याण विभाग, पुणे यांच्याद्वारे हिंगोली जिल्हयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नशामुक्त भारत अभियान जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

                 या समितीमार्फत दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वा. राज्य परिवहन मध्यवर्ती बसस्थानक, हिंगोली या ठिकाणी नशामुक्त भारत अभियानांतर्गत भव्य व्यसनमुक्ती चित्र प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले आहे. या  कार्यक्रमास उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व प्रमुख पाहुणे म्हणून जि.पचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संजय दैने,  व राज्य परिवहन हिंगोलीचे आगार व्यवस्थापक पी.बी. चौथमल यांची उपस्थिती लाभणार आहे.

                तरी सदरील कार्यक्रमास जिल्हयातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आ. एच. एडके, व नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक,  विशाल अग्रवाल यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

*****

 

 

 

 

No comments: