भूमी अभिलेख विभागातील गट-क च्या भूकर मापक तथा लिपिक संवर्गाची
ऑनलाईन परीक्षा 28 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत
- पात्र उमेदवारांनी
संकेतस्थळावरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचे आवाहन
हिंगोली
(जिमाका), दि. 18 : भूमि अभिलेख विभागातील
गट-क पदसमूह 4 (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी
दि. 9 डिसेंबर, 2021 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार दि. 9
डिसेंबर, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 या कालावधीत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर
केलेले आहेत. त्यानंतर सदर अर्जदारांना विभागाकडून दि. 28 फेब्रुवारी, 2022 ते 13
मार्च, 2022 या कालावधीत छाननी अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली
होती.
छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये
उमेदवारांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येऊन भूमी अभिलेख
विभागातील गट क पदांच्या सेवा प्रवेश नियमानुसार जाहिरातीत नमूद केलेल्या
अर्हतेऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्र अपलोड केलेली आहेत, अशा उमेदवारांना अपात्र
ठरवून संपूर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची सामान्य प्रशासन
विभागाकडील दि. 4 मे, 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन परीक्षा (Computer
Based Test) दि. 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत आयबीपीएस (IBPS)
कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रावर घेण्यात येणार आहे.
परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व
उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या https://mahabhumi.gov.in या अधिकृत
संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी संबंधित
संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावेत आणि
त्या प्रवेशपत्रावर नमूद परीक्षा केंद्रावर उमेदवारांने दिलेल्या वेळेत उपस्थित
राहून परीक्षा द्यावयाची आहे.
परीक्षा पध्दतीबाबतची सविस्तर माहिती
पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच
परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठीची लिंक देखील दि. 14 नोव्हेंबर, 2022
पासून विभागाच्या उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती
उपसंचालक भूमि अभिलेख, औरंगाबाद प्रदेश, औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
दिली आहे.
******
No comments:
Post a Comment