18 November, 2022

 आंतरराष्ट्रीय दत्तक महिना व बाल सप्ताह निमित्त जनजागृती कार्यक्रम

 

            हिंगोली (जिमाका), दि. 18 : आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्ताने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष हिंगोली कडून बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर हिंगोली जिल्ह्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही.जी.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार आंतरराष्ट्रीय दत्तक महिना व बाल सप्ताह निमित्ताने जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे आंतरराष्ट्रीय दत्तक महिना व बाल हक्क सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. दिपक मोरे, डॉ. मंगेश टेहरे आदी उपस्थित होते.

त्याअनुषंगाने यावेळी बालकासाठी असणारे कायदे, यंत्रणा इत्यादी संदर्भात रेल्वे स्टेशन, बसस्टॅन्ड, शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजार इत्यादी गर्दीच्या ठिकाणी जनजागृती करण्यात आली. महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच जिल्ह्यात कायदेशीर दत्तक प्रक्रियेची जाणीव जनजागृती करण्यात आली आहे. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय दत्तक महिना राबविण्यात येत आहे. दत्तक विधान नियमावली 2022 नुसार दत्तक घेणारे पालकांनी कायदेशीर बाळ दत्तक घेण्यासाठी www.cara.nic.in या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करुन बाळ दत्तक घेता येते. अवैध पध्दतीने बाळ दत्तक घेतल्यास संबधितावर गुन्हा नोंद होऊ शकतो. तसेच जिल्हयात एखादे निराधार, अनाथ, बेवारस मुल, सापडलेले बालक किंवा एखादी कुमारी माता, विधवा माता असेल व तिला नुकतेच जन्मलेले बाळ नको असेल तर आपण मा.बाल कल्याण समिती हिंगोली, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली व चाईल्ड लाईन (1098) यांना संपर्क करुन त्यांची मदत करु शकता.

            यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्था बाह्य) जरीबखान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे व सामाजिक कार्यकर्ता - रामप्रसाद मुडे इ.अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

*****


No comments: