11 November, 2022

 

ग्रंथ विक्रेते व प्रकाशकांनी ग्रंथविक्री स्टॉलसाठी 17 नोव्हेंबर पर्यंत संपर्क साधावा

ग्रंथोत्सव समन्वय समितीचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 11 :  महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय म.रा.मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली मार्फत हिंगोली येथे दि. 19 व 20 नोव्हेंबर, 2022 रोजी दोन दिवशीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या ग्रंथोत्सवाचा उददेश ग्रंथप्रसार, ग्रंथप्रदर्शन व ग्रंथविक्री असा असून प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि ग्रंथप्रेमी वाचकांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा सहभाग असलेले विविध कार्यक्रम जसे परिसंवाद, काव्यवाचन, वक्तृत्व स्पर्धा आणि वाचनाची आवड वृध्दींगत व्हावी यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ग्रंथोत्सवामध्ये ग्रंथप्रदर्शन व ग्रंथविक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

हिंगोली ग्रंथोत्सवामध्ये ग्रंथविक्रेते व प्रकाशकांनी त्यांना ग्रंथविक्रीसंदर्भात स्टॉल लावावयाचा असल्यास जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, विराज प्लॉट नं. 45, नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली-431513 (मो.क्रमांक 9403067267) कार्यालयास दि. 17 नोव्हेंबर, 2022 पर्यंत संपर्क साधावा. ग्रंथ विक्रेते व प्रकाशक यांनी मोठ्या प्रमाणात या ग्रंथोत्सवात सहभागी व्हावेत, असे आवाहन ग्रंथोत्सव समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

****

No comments: