राष्ट्रीय पत्रकार दिन
साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 16 : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली यांच्यावतीने
आज ‘राष्ट्रीय पत्रकार दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार सर्वश्री प्रद्यूम्न गिरीकर, कल्याण देशमुख, सुभाष अपुर्वा, सचिन कावडे,
दिलीप हाळदे, बाबुराव ढोकणे, विलास जोशी , संतोष राठोड, विजय गुंडेकर, हाफीज
बागवान, चंद्रकांत वैद्य, राजु गवळी,अरुण दिपके,मिलींद वानखेडे,महिला पत्रकार
पल्लवी अटल यांची उपस्थिती होती.
पत्रकारितेतील वृत्तपत्र स्वातंत्र्याची जपणूक होऊन पत्रकारीतेतील
उच्च मुल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाची 16 नोव्हेंबर,
1966 रोजी स्थापन करण्यात आली. या अनुषंगाने सन 1997 पासुन दरवर्षी 16 नोव्हेंबर
हा प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाचा स्थापना दिवस ‘राष्ट्रीय पत्रकार दिन’ म्हणुन देशभर
साजरा करण्यात येतो. यावेळी पत्रकार प्रद्युम्न गिरीकर आणि कल्याण देशमुख यांनी
मार्गदर्शन करत सर्व पत्रकार बांधवांना राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या शुभेच्छा
दिल्या.
प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा
माहिती कार्यालयातील श्रीमती आशा बंडगर, कैलास लांडगे, परमेश्वर सुडे आणि चंद्रकांत
गोधने यांनी सहकार्य केले.
****
No comments:
Post a Comment