10 November, 2022

 

मिशन वात्सल्य अंतर्गत विधवा महिलांची

मालमत्ताविषयक प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावेत

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 


हिंगोली (जिमाका), दि. 10 : मिशन वात्स्ल्य अंतर्गत विधवा महिलांची मालमत्ताविषयक प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावेत. तसेच पोखरा योजनेतून काही लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  जिल्हा कृती दलाच्या आढावा बैठकीत दिले.

आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 जिल्हा कृती दलाची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी  गणेश वाघ, नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सहा.आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग, समाज कल्याण विभाग, जिल्हा माहिती अधिकारी यांचे प्रतिनिधी, बाल कल्याण समिती सदस्य श्रीमती किरण करडेकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा जिल्हा कृतीदल समन्वयक सरस्वती कोरडे,  जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद  मुडे आदी  उपस्थित होते.

या बैठकीत आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कोविड-19 या आजारामुळे एकूण 219 बालकांपैकी एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 216 व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 03  आहे. या 219 बालकांच्या घरी जावुन त्यांच्या भेटी घेवून बालकांना व त्यांच्या पालकांना समुपदेशन करण्याचे काम देखील जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत वेळोवेळी केले जात आहे. या 219 बालकांपैकी 204 बालकांचे बाल न्याय निधी अंतर्गत इयत्तानिहाय बाल न्याय निधी वितरीत करण्यात आला आहे. उर्वरित बालकांच्या पालकांकडून बाल न्याय निधीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, तसेच जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या 03 बालकांना विधी सेवा समितीच्या माध्यमातून बालकांना पालकत्वाचे/वारसा/मालमत्तेचे अधिकार मिळवून देण्याबाबत मा.सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्याशी   पत्र व्यवहार करण्यात आला असून विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे पालकत्वाचे/वारसा/मालमत्तेचे अधिकार मिळवून देण्यासाठी पॅनल ॲड. डि.बी. खंदारे वकील संघ यांची नियुक्ती करण्यात आली असल्याबाबतची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा जिल्हा कृती दलाचे सदस्य सचिव व्ही . जी.  शिंदे यांनी जिल्हाधिकारी  कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत दिली.

****

No comments: