समता पर्वानिमित्त आयोजित मार्जीन मनी कार्यशाळेस उपस्थित
राहण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 28 : केंद्र शासनाने सन 2015 मध्ये स्टँड अप ही योजना घोषित केली आहे.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील
नव उद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या नवउद्योजक
लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी हिस्स्यामधील 15 टक्के मार्जिन
मनी उपलब्ध करुन देण्याची योजना सुरु करण्यात आलेली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभागामार्फत दि. 26 नोव्हेंबर संविधान दिन ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण
दिन दि. 6 डिसेंबर, 2022 पर्यंत समता पर्व साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने
दि. 1 डिसेंबर, 2022 रोजी युवा गटाची मार्जीन मनी योजनेविषयीची कार्यशाळा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे सभागृह, दर्गा रोड, रिसाला बाजार,
हिंगोली येथे सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वा. आयोजित करण्यात आलेली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती व
नवबौध्द घटकातील नवउद्योजकांनी या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन शिवानंद
मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment