सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा या विषयावर
पत्रकाराची कार्यशाळा संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 29 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात 26
नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ते 06 डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण
दिन कालावधीत "समता पर्व" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज दि.
29 नोव्हेंबर रोजी शिवानंद मिनगीरे,सहाय्यक
आयुक्त, समाज कल्याण,हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक न्याय भवन,हिंगोली येथे सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा या विषयावर पत्रकारांची
कार्यशाळा घेण्यात आली .
या पत्रकार कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी माहिती सहायक चंद्रकांत
कारभारी हे होते. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, दैनिक सकाळचे राजेश
दारवेकर, दैनिक सामनाचे सचिन कवडे, लोकमत समाचारचे दिलीप हळदे, आदर्श गावकरीचे मकरंद
बांगर, लोकमतचे चंद्रमुनी बलखंडे, न्यूज एमकेएममराठीचं सुधाकर वाढवे, टी.व्ही.सेवनचे
अरुण दिपके, गोदातीर समाचारचे बाबूराव ढोकणे, तेजस्वी लेखनीचे प्रा.उत्तम बलखंडे, तरुण
भारचे विजय गुंडेकर, एफ.टी.नागरे इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमात आदर्श गावकरीचे मकरंद बांगर व सा.तेजस्वी लेखनीचे
प्रा.उत्तम बलखंडे यांनी संविधान या विषयावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.
तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभागाच्या सर्व योजनांची माहिती सांगून सामाजिक न्याय विभागाच्या योजना
घरा-घरापर्यंत, लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पत्रकार बंधूना आवाहन केले. तसेच
अध्यक्षीय समारोप कार्यक्रमात चंद्रकांत कारभारी यांनी संविधान व सामाजिक न्याय
विभागाच्या योजना हिंगोली जिल्ह्यात घरोघरी पोहचविण्यासाठी माहिती कार्यालय व सर्व
पत्रकार बंधू कटीबध्द असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ
गोवंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक इंगोले यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवर व पत्रकारांच्या हस्ते महात्मा
ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन
करण्यात आले.
यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सत्यजीत नटवे, श्रीकांत कोरडे,
आत्माराम वागतकर, एम.आर.राजुलवार, सुनिल वडकुते, आर.टी.ससाने, नितीन राठोड, भास्कर
वाकळे, मोतीराम फड, सखाराम चव्हाण, बाळू पवार, नागनाथ नकाते, सुलोचना ढोणे, पल्लवी
गिते, रोहिनी जोंधळे, विशाल इंगोले, सुरेश पठाडे, दिपक कांबळे, संदिप घनतोडे,
राहुल भराडे, जयदिप देशपांडे, गयाबाई खंदारे, दत्ता कुंभार, बाळू नागरे, नरेश
पौळकर, श्रावण खरोडे, हरिष पुंडगे, राहूल जाधव, संदिप पौळकर आदी मोठया संख्येने
उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment