भारत जोडो पदयात्रा संबंधित सोशल मिडियावर भडकावू भाषणे, पोस्ट
प्रसारित केल्यास
दंडात्मक कारवाई करण्याचे जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश
हिंगोली (जिमाका), दि. 07 : जिल्ह्यात दि. 11 नोव्हेंबर ते दि. 15 नोव्हेंबर, 2022 या दरम्यान राष्ट्रीय
काँग्रेस पार्टीचे खासदार राहूल गांधी यांचा भारत जोडो पदयात्रा निमित्त हिंगोली
जिल्हा दौरा कार्यक्रम असून त्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या
कार्यक्रमास इतर राजकीय पक्षाचे वर्गीकृत, अवर्गीकृत व्यक्ती हजर राहण्याची शक्यता
असून खासदार राहूल गांधी यांचे नांदेड येथून हिवरा पाटी मार्गे हिंगोली जिल्ह्यात
आगमन होणार आहे. पुढे वारंगा फाटा-बाळापूर-कळमनुरी-हिंगोली-कनेरगाव (नाका) मार्गे
वाशिम जिल्ह्यात जाणार आहेत.
या भारत जोडो पदयात्रा संबंधाने हिंगोली ते वाशिम दरम्यान मोठ्या
प्रमाणावर जनसमुदाय सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. या पदयात्रे संदर्भात भडकावू
भाषणाची व्हिडिओ क्लीप, घोषणा, घोषवाक्य किंवा छायाचित्रे, व्यंगचित्रे इत्यादी
सोशल मिडियावर प्रसारित होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता
नाकारता येत नाही.
या भारत जोडा पदयात्रेच्या संपूर्ण कालावधी दरम्यान हिंगोली
जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टिकोनातून भडकावू भाषणाची
व्हिडिओ क्लीप, घोषणा, घोषवाक्य किंवा छायाचित्रे, व्यंगचित्रे इत्यादी सोशल
मिडियावर प्रसारित होण्यास प्रतिबंध होण्यासाठी आदेश देण्याचे जिल्हा पोलीस
अधीक्षक, हिंगोली यांनी कळविले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने
भारत जोडो पदयात्रा संबंधाने सोशल मिडियावर कोणत्याही प्रकारच्या पोष्ट, भडकावू
भाषणे, आक्षेपार्ह इत्यादी बाबी प्रसारित करण्यास भारतीय दंड संहिता 1860 कलम 553
(अ), 116, 505 नुसार दंडनीय अपराध केला आहे, असे गृहीत धरुन कारवाई करण्याचे आदेश
जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
*****
No comments:
Post a Comment