18 November, 2022

 

हिंगोली शहरातील शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापकांनी

ग्रंथोत्सवात सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

 

            हिंगोली (जिमाका), दि. 18 :  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या मार्फत येथील बियाणी नगरमध्ये असलेल्या कै. र.रा. बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालय आवारात दि. 19 व 20 नोव्हेंबर, 2022 रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्ताने जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा सहभाग असलेले विविध कार्यक्रम जसे परिसंवाद, काव्यवाचन आणि वाचनाची आवड वृध्दींगत व्हावी यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ग्रंथ प्रसार, ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्री असा या ग्रंथोत्सवाचा उद्देश असून प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि ग्रंथप्रेमी वाचकांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम आहे. 

या ग्रंथोत्सवात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी व त्यांना ग्रंथसहवास लाभून वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी दि. 19 व 20 नोव्हेंबर रोजी आयोजित ग्रंथोत्सवास हिंगोली शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापकांनी उपस्थित राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

*****

No comments: