19 November, 2022

ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद







 

हिंगोली (जिमाका), दि. 19 :  आज ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या सत्रामध्ये नवोदित कवींचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कवि संमेलनात नवोदित कवींनी सामाजिक, शैक्षणिक, गेय तसेच राजकीय विडंबन विषयक कवितांचे सादरीकरण केले. या कवि समेंलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयात आयोजित हिंगोली ग्रंथोत्सव-2022 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात कलानंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन घेण्यात आले.

या कवी संमेलनात दिलीप धामणे, अनिकेत देशमुख, गणेश येवले, संगीता चौधरी, पांडूरंग गिरी, गजानन मेटकर, संतोष परसावळे, सुमन दुबे, डॉ.वंदना काबरा, शिवाजी कऱ्हाळे, डॉ.राधिका देशमुख, पारिजात देशमुख, गणपत माखने, राजकुमार मोरगे, बालाजी शेळके, रघुनाथ घुगे, विनोद कांबळे यांनी आपल्या कविता सादर केल्या.

या कवि संमेलनाचे शानदार सूत्रसंचालन रतन आडे यांनी केले. या कवी संमेलनास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासकीय ग्रंथ विक्रीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रंथोत्सवानिमित्त येथे लावण्यात आलेल्या शासकीय ग्रंथागार, औरंगाबाद व बालभारतीच्या ग्रंथ स्टॉलवर तसेच इतर सर्व ग्रंथ स्टॉलवर ग्रंथ खरेदीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ग्रंथाची खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत.

***** 

No comments: