15 November, 2022

 

गटई स्टॉल योजना करीता प्रस्ताव सादर करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 15 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत गटई कामगारांना गटई काम करण्याकरीता ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात गटई स्टॉल देण्याची योजना राबविण्यात येते.

सदर गटई स्टॉल योजनेकरीता हिंगोली जिल्ह्यातील सर्व इच्छुक लाभार्थ्यांनी दि. 21 नोव्हेंबर, 2022 पर्यंत, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे  प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

*****

No comments: