11 November, 2022

 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत

हिंगोली जिल्हा आधार सिडींगमध्ये देशात अव्वल

 

हिंगोली (जिमाका), दि. 11 :  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत दि. 1 एप्रिल, 2018 पासून हिंगोली जिल्ह्यात इंटेंसिव्ह पध्दतीने काम सुरु आहे. या अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 8976 बचत गट कार्यरत असून सर्व बचत गट एनआरएलएम एमआयएस पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये 84053 कुटुंब समाविष्ट झालेले आहेत. अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहायता समुहामध्ये समाविष्ट झालेल्या सर्व सदस्यांचे त्यांच्या नावासमोर त्यांचे आधार क्रमांक लिंक करण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचही तालुक्यामधील स्थापन झालेल्या व पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आलेल्या सर्व स्वयंसहायता समुहाचे व त्याअंतर्गत असणाऱ्या सर्व सदस्यांचे आधार क्रमांक लिंक करण्यात आलेले आहेत. या कामात हिंगोली जिल्हा हा केवळ महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात एनआरएलएममध्ये अव्वल क्रमांकावर आहे.  

हे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हास्तरावरुन जे. व्ही. मोडके, विक्रम सारस्वत, ओमप्रकाश गलांडे, राम मेकाले तसेच तालुकास्तरावरुन राजू दांडगे, सिध्दार्थ पंडित, उज्वला गायकवाड, संतोष भोसकर, प्रकाश धुळे, स्मिता कटके, लक्ष्मण सातपुते, अनंत मुळे, लता सुर्यवंशी, मिलींद कुकडे, रमेश पवार, दिपक काशिदे, पांडूरंग खरात, विष्णू खाडे, तानाजी काळे, श्रीमती पाटसे, सर्वश्री. धाबे, लोखंडे, तपासे, पतंगे, सोनकांबळे, मगरे, बोडखे, बोराळकर, वानखेडे, अशोक मोरे या सर्व कर्मचाऱ्यांना कामगिरी बजावली आहे.

****

No comments: