हिंगोली येथे 19 व 20 नोव्हेंबर
रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन
ग्रंथ प्रदर्शन-विक्री, नवोदितांचे
कवी संमेलन, परिसंवाद, व्याख्यानाची मेजवानी.
हिंगोली (जिमाका), दि. 16 : महाराष्ट्र
शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय म.रा.मुंबई व जिल्हा ग्रंथालय
अधिकारी, कार्यालय हिंगोली यांच्या विद्यमाने ‘हिंगोली ग्रंथोत्सव-2022’ चे आयोजन करण्यात
आले आहे. कै.रं.रा.बियाणी नुतन साहित्य मंदिर वाचनालय, बियाणी नगर, हिंगोली येथे दि
19 व 20 नोव्हेंबर असे दोन दिवसात ग्रंथपेमीना विविध कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे.
ग्रंथप्रसार, ग्रंथप्रदर्शन व ग्रंथविक्री असा या ग्रंथोत्सवाचा उद्देश आहे. याठिकाणी
ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले असून त्यात शासकीय प्रकाशने व दुर्मिळ
ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
दि 19 नोव्हेंबर रोजी सकाळी
9.00 वाजता कै.र.रा.बियाणी नुतन साहित्य मंदिर वाचनालय, बियाणी नगर येथून मुख्य कार्यकारी
अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ होणार आहे. या दिंडीमध्ये विविध लोककला सादरीकरण लेझिम पथक,भजनीमंडळ
यासह विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सदानंद देशमुख यांच्या
हस्ते सकळी 11.00 वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी
जिंतेंद्र पापळकर हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे पालकमंत्री अब्दुल सत्तार,
खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री सतिश चव्हाण, विक्रम काळे, विप्लव बाजोरीया, श्रीमती
डॉ. प्रज्ञा सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, चंद्रकांत नवघरे, ग्रंथालय
संचालक दत्तात्रय क्षीरसागर, औरंगाबाद येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांची
प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारच्या सत्रात "नवोदितांचे कवी संमेलनाचे’ आयोजन करण्यात
आले आहे. तर दि 20 नोव्हेंबर दुसऱ्या दिवशी सकाळी 09.00 ते 11.30 या कालावधीत “वाचन संस्कृती आणि ग्रंथालये" या विषयावर परिसंवाद
होणार आहे. त्यानंतर 11.30 ते 01.30 वाजेदरम्यान
साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे व कवीवर्य वसंत बापट यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व्याख्यान
होणार आहे. तर दुपारी 02.30 ते 05.00 दरम्यान स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना पूरक
ग्रंथवाचनाचे महत्व या विषयावर मनोहर भोळे यांचे व्याख्यान होणार आहे. दोन दिवसीय ग्रंथोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन
ग्रंथोत्सव समन्वय समितीने केले आहे.
*****
No comments:
Post a Comment