11 November, 2022

 

नाफेडच्या वतीने हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदी सुरु

खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 11 :  केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने खरीप हंगाम 2022-23 मध्ये  मूग, उडीद, सोयाबीन  हमीभावाने  खरेदी  करण्यासाठी खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले असून या खरेदी केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी दि. 4 नोव्हेंबर, 2022 पासून नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. तसेच याच खरेदी केंद्रावर दि. 10 नोव्हेंबर,2022 पासून ते दि. 07 फेब्रुवारी,2023 पर्यंत मूग,उडीद,सोयाबीन खरेदी सुरु करण्यात आलेली आहे.

मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात सात खरेदी केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. खरेदी केंद्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

            हिंगोली तालुक्यासाठी प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था , हिंगोली ही संस्था असून खरेदी केंद्राचे ठिकाण बलसोंड ता.जि.हिंगोली  असा आहे. या संस्थेवर केंद्रचालक म्हणून समीर देवराव पाटील हे कामकाज पाहणार असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9422922222 असा आहे. तसेच संत नामदेव स्वयंरोजगार सहकारी संस्था म. चोरजवळा या संस्थेचे खरेदी केंद्र कन्हेरगांव ता. जि. हिंगोली  येथे असून या संस्थेवर केंद्रचालक म्हणून अमोल काकडे हे कामकाज पाहणार असून त्यांचा भ्रमणध्वनी क्र.8007386143 असा आहे.

कळमनुरी तालुक्यासाठी कयाधु शेतकरी उत्पादक कं. मर्या. तोंडापूर ता. कळमनुरी ही संस्था असून या संस्थेचे खरेदी केंद्र कृषी उत्पन्न बाजार समिती, कळमनुरी येथे आहे. या केंद्रावर केंद्र चालक म्हणून महेंद्र माने हे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9736449383  असा आहे.

औंढा नागनाथ तालुक्यासाठी औंढा नागनाथ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. औंढा (ना) ही संस्था असून या संस्थेचे खरेदी केंद्र जवळा बाजार ता. औंढा नागनाथ येथे आहे. या संस्थेवर  केंद्र चालक म्हणून कृष्णा हरने हे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9175586758 असा आहे.

वसमत तालुक्यासाठी  वसमत तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित, वसमत ही संस्था असून या संस्थेचे खरेदी केंद्र मार्केट कमिटी, वसमत येथे आहे. या केंद्रावर केंद्र चालक म्हणून सागर इंगोले हे काम पाहणार आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमाक 8390995294 असा आहे.

सेनगांव तालुक्यासाठी श्री संत भगवानबाबा  स्वयंरोजगार सेवा संस्था कोथळज ही संस्था असून या संस्थेचे खरेदी केंद्र सेनगाव येथे आहे. या केंद्राचे केंद्र चालक म्हणून निलेश रावजीराव पाटील असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9881162222  असा आहे. तसेच विजयलक्ष्मी बेरोजगार सहकारी संस्था म. कोळसा ता. सेनगाव या संस्थेचे साखरा ता. सेनगाव येथे खरेदी केंद्र असून या केंदावर केंद्र चालक म्हणून उमाशंकर माळोदे हे काम पाहणार आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9403651743 असा आहे.

            शेतकरी बांधवांनी आपल्या तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी संपर्क करुन नोंदणी करावी. नोंदणीसाठी हंगाम 2022-23 मधील पीक पेरा नोंद असलेला ऑनलाईन सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स सोबत आणावे व बँक पासबूकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक,  आय.एफ.एस.सी. कोड स्पष्ट असावा (जनधन बँक खाते किवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये). संबंधित तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी मूग, उडीद, सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावे, असे आवाहन  के. जे. शेवाळे, जिल्हा पणन अधिकारी, परभणी/हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

****

No comments: