18 November, 2022

 

गटई स्टॉल योजनेसाठी 25 नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 18 : गटई कामगारांना गटई काम करण्यासाठी ग्रामपंचायत नगरपालिका क्षेत्रात गटई स्टॉल देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या गटई स्टॉल योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व इच्छूक लाभार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली या कार्यालयाशी संपर्क साधून दि. 25 नोव्हेंबर, 2022 पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण, हिंगोली यांनी केले आहे.  

***** 

No comments: