12 November, 2022

 

हिंगोली येथील लोकन्यायालयामध्ये

2 कोटी 65 लाख 70 हजार 77 रुपयांची 234 प्रकरणे निकाली

 





हिंगोली (जिमाका), दि. 12 : येथील तालुका विधी सेवा समिती, सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालय व परभणी जिल्हा न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालयामध्ये दि. 12 नोव्हेंबर, 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित असलेली 86 प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका, वाद दाखलपूर्व 148 प्रकरणे असे एकूण 234 प्रकरणे तडजोडीआधारे निकाली काढण्यात आले. या लोकन्यायालयात प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणात तब्बल 2 कोटी 65 लाख 70 हजार 77 रुपये  रक्कम ठरवून तडजोडी आधारे प्रकरणे निकाली काढण्यात आली.

अपघातात अपंगत्व आलेल्या इसमाची बाजू समजून घेण्यासाठी न्यायाधीश पॅनलवरुन उतरले खाली

या लोकन्यायालयामध्ये भास्कर जनार्धन कटारे या 50 वर्षीय अपंग व्यक्ती लोकअदालतीसाठी हजर होते. त्यांना चालता येत नसल्याने जिल्हा न्यायालयामध्ये वरील मलल्यावर पोहचणे शक्य होत नसल्याने हिंगोली जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश  डी. जी. कांबळे यांनी स्वत: पॅनलवरुन उतरुन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीसमोरील आवारात उभ्या वाहनामध्ये बसलेले भास्कर जनार्धन कटारे यान 50 वर्षीय अपंग व्यक्तीच्या जवळ जाऊन त्यांची बाजू ऐकूण घेतली. तसेच त्या प्रकरणात 8 लाख 75 हजार नुकसान भरपाई रकमेवर तडजोड करुन प्रकरण निकाली काढण्यात आले. भास्कर कटारे यांची बाजू ॲड. एस.बी.गडदे यांनी मांडली.

या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथे न्यायिक अधिकारी तसेच विधीज्ञ समाविष्ट असलेली पाच पॅनल तयार करण्यात आले होते.

या लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायाधीश-2 डी. जी. कांबळे, जिल्हा न्यायाधीश-3 श्री. व्ही. बुलबुले, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जी. के. नंदनवार, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आय. जे. ठाकरे, कु.पी.आर. पाननानी यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केले. या लोकअदालतीला दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी. यु. राजपूत, वकील संघाचे कार्याध्यक्ष ॲड.मतीन पठाण, वकील संघाचे सर्व सभासद, न्यायालयीन व पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. ॲड. बी.पी. घनघाव, ॲड. व्ही. डी. दायमा, ॲड. जी. जी. कोरडे, ॲड.ए.एन.रणबावळे, ॲड. आर. सी. लबडे यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले.

 

*****

 

No comments: