व्यायामशाळा, क्रीडांगण विकास व युवक कल्याण अनुदानासाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 09 : येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2022-23 या आर्थिक
वर्षासाठी व्यायामशाळा विकास, क्रीडांगण विकास व युवक कल्याण अनुदान (सर्व
साधारण/विशेष घटक/आदिवासी) योजनेअंतर्गत परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे अंतिम
तारीख दि. 25 नोव्हेंबर, 2022 रोजी दुपारी ३.०० वा.पर्यंत मागविण्यात येत आहेत. विहित
अर्जाचे नमुने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत दि.
11 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 1.00 वा. या
वेळेत उपलब्ध आहेत.
नवीन व्यायामशाळा विकास अनुदान योजनेसाठी दि.16 जानेवारी, 2018 व
दि. 8 जानेवारी, 2019 च्या शासन निर्णयानुसार व्यायामशाळा साहित्य, खुली
व्यायामशाळासाठी शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय रुग्णालय, शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अनुदानित शाळा, महाविद्यालय, जिल्हा परिषद, सर्व शासकीय
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वस्तीगृह, समाज कल्याण
विभागामार्फत चालविल्या जाणऱ्या अनुदानित शाळा, शासकीय उप जिल्हा रुग्णालय, जिल्हा
रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
शासनाने मान्यता दिलेल्या अनुदानित शैक्षणिक शाळा, महाविद्यालय, पोलीस कल्याण मंडळ,
पोलिस विभाग, शासकीय कार्यालय इत्यादीकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी दि. 07 सप्टेंबर,2019 च्या शासन
निर्णयानुसार क्रीडा साहित्य व क्रीडांगण विकासासाठी शासकीय शाळा, महाविद्यालय,
जिल्हा परिषद, सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व
वस्तीगृह, समाज कल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या अनुदानित शाळा, शासकीय उप
जिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय, शासनाने मान्यता दिलेल्या अनुदानित शैक्षणिक शाळा,
महाविद्यालय, पोलिस कल्याण मंडळ, पोलीस विभाग, शासकीय कार्यालय इत्यादीकडून
प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
युवक कल्याण अनुदान योजनेसाठी
मा. धर्मादाय आयुक्त, हिंगोली यांनी रद्द केलेल्या संस्थांनी प्रस्ताव सादर
करु नयेत, तसेच प्रस्तावासोबत कार्यक्रमाचा अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.
शासनाकडून प्राप्त अनुदानाच्या अनुषंगाने परिपूर्ण असलेले प्रस्ताव
प्राधान्य क्रमाने मंजूर करण्यात येतील, याची
नोंद घ्यावी, तसेच उपरोक्त दिलेल्या विहित मुदतीनंतर प्रस्ताव
किंवा त्रुटींची पूर्तता केली जाणार नाही. त्यामुळे परिपूर्ण प्रस्ताव सादर
करावेत. त्रुटींची पुर्तता करण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार क्रीडा कार्यालयाकडून
केला जाणार नाही यांची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय मुंढे
यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment