एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी
1 ते 15 जुलै या कालावधीत आधार नोंदणी शिबिराचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 29 : एकात्मिक बाल विकास
सेवा योजना अंतर्गत सर्व लाभार्थ्याचे पोषण ट्रॅकर अॅप्लिकेशनवर आधार नोंदणी
दिनांक 15 जुलै 2022 रोजी पर्यंत पूर्ण करणेच्या सूचना दिलेल्या आहेत.
त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत सर्व अंगणवाडी
केंद्रातील आधार नोंदणीचे कामकाज दिलेल्या मुदतीमध्ये तात्काळ पूर्ण करण्यासाठी सर्व
अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्याचे आधार नोंदणी शिबिराचे आयोजन दिनांक 01 जुलै ते
दिनांक 15 जुलै, 2022 या कालावधीत करण्यात येणार आहे. आठवड्यातील दर शनिवार व
रविवारी देखील आधार नोंदणी कॅम्प ठेवण्यासाठी मा. आयुक्त एबाविसेयो मुंबई यांच्याकडे
परवानगी मागितली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील आधार नोंदणी कॅम्पचे आयोजन
करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेला महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी
अधिकारी गणेश वाघ यांनी सूचना दिलेल्या आहेत.
विहित कालावधीत आधार नोंदणीचे कामकाज पूर्ण होणे आवश्यक असल्याने
अंगणवाडी केंद्रातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना आधार नोंदणीसाठी जन्म दाखला
अनिवार्य आहे. त्यामुळे सर्व गट विकास अधिकारी यांनी त्यांचे अधिनिस्त सर्व
ग्रामसेवक यांना प्राधान्याने सदरील बालकांना जन्म दाखला देण्याबाबत आदेशित करावे.
जेणेकरुन बालकांचे आधार नोंदणीचे कामकाज विहित कालावधीत पूर्ण करणे शक्य होईल.
तसेच ज्या अंगणवाडी केंद्रांच्या ठिकाणी विद्युत व्यवस्था नाही. त्या ठिकाणी
ग्रामपंचायत कार्यालय किंवा इतर विद्युत व्यवस्था असलेले ठिकाण उपलब्ध करुन
देणेबाबत सूचना सर्व ग्रामसेवकांना देण्यात याव्यात. तसेच संबंधित ग्राम पंचायत
कर्मचारी यांचे मार्फत आधार कॅम्पच्या दिवशी गावामध्ये दंवडी देण्याच्या सूचना
देण्यात याव्यात.
सर्व आधार केंद्र चालकांनी शिबीर कालावधीत दररोज सकाळी 9.00 वाजता
नियोजन केल्याप्रमाणे संबंधित अंगणवाडी केंद्रावर उपस्थित राहून अंगणवाडी
केंद्रातील सर्व बालके, लाभार्थ्यांचे आधार नोंदणीचे कामकाज पूर्ण करावेत. सोबत
संपूर्ण आधार कीट, रजिस्टर, बॅनर बोर्ड, तक्रार / अभिप्राय पुस्तक सोबत ठेवावे.
नागरिकांना प्रत्येक पावती देणे बंधनकारक राहील. आधार नोंदणीसाठी निश्चित केलेल्या
दरपत्रकानुसारच शुल्क आकारण्यात यावे. प्रथम आधार नोंदणी ही निशुल्क आहे. संबंधित
अंगणवाडी सेविकेसोबत पहिल्या दिवशी संपर्क साधून आवश्यक सूचना देण्यात याव्यात व
आधार नोंदणीचा दैनंदिन अहवाल जिल्हा समन्वयक यांना सादर करावा.
संबंधित जिल्हा
समन्वयक यांनी अधिनिस्त सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालक (आधार केंद्र चालक)
यांच्याशी संपर्क साधून नियोजित वेळापत्रकानुसार गावनिहाय आधार नोंदणी कॅम्पचे
आयोजन करावे, याबाबत काही अडचण आल्यास संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी व
अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्याशी संपर्क साधावा, नागरिकांना कोणत्याही प्रकारची
गैरसोय होणार नाही किंवा त्यांना जास्त वेळ प्रतिक्षा करण्याची वेळ पडणार नाही,
याची दक्षता घेण्यात यावी, तसेच आधार कॅम्पशी संबंधित काही सूचना असल्यास संबंधित
अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, आधार केंद्र चालक यांच्याशी समन्वय साधून
जास्तीत जास्त आधार नोंदणीचे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न करावेत व आधार
नोंदणीबाबतचा जिल्ह्याचा एकत्रित अहवाल दररोज महिला व बालविकास विभागास सादर
करण्यात यावा.
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने या शिबिराच्या कालावधीत विद्युत व्यवस्था खंडीत
होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
या शिबीरामध्ये हिंगोली जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा
अंतर्गत सर्व लाभार्थ्याच्या, बालकांचे आधार नोंदणीचे कामकाज आठवड्यातील सर्व दिवस
सुरु राहणार आहे. त्या ठिकाणी लाभार्थ्यांची गर्दी जमू शकते व इतर गावकरी देखील
आधार नोंदणी, दुरुस्ती करण्याबाबत मागणी करण्याची शक्यता आहे. परंतु हे अभियान
प्राधान्याने केवळ अंगणवाडी केंद्रातील बालके व लाभार्थ्यासाठी असल्यामुळे त्या
सर्व ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व
उपाय योजना करण्याच्या सूचना संबंधित पोलीस कर्मचारी यांना देण्यात याव्यात.
सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी उक्त कालावधीमध्ये अंगणवाडी
केंद्रातील सर्व बालके व लाभार्थ्यांचे आधार नोंदणी करण्याचे कामकाज विहित
कालावधीत पूर्ण होण्यासाठी सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी
मदतनीस यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्याकरिता कॅम्पच्या दिवशी बालके
(पालकांसह) व लाभार्थ्याची आधार नोंदणीसाठी यांना आधार नोंदणी केंद्रामध्ये
बोलविणे, अंगणवाडी केंद्र सुरु ठेवणे, आधार केंद्र चालकांशी समन्वय साधून आवश्यक सर्व
सहकार्य करणे, आधार कॅम्पच्या दिवशी पूर्णवेळ त्या ठिकाणी उपस्थित राहणे, त्या ठिकाणी
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, आधार नोंदणी अर्ज अचूकरित्या भरण्यासाठी
लाभार्थ्यांना मदत करणे. लाभार्थ्याकडील कागदपत्रांची पूर्तता करणे, आधार
केंद्रचालकांना आधार नोंदणी झाल्यानंतर किती बालकांची नोंदणी पूर्ण झाली आहे या
बाबतचे प्रमाणपत्र देणे व त्याबाबतचा अहवाल संबंधित अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यामार्फत
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास कार्यालयास सादर करणे. सर्व अंगणवाडी सेविका व
मदतनीस यांनी आधार कॅम्पच्या दिवशी आधार शिबिराची दंवडी गावामध्ये द्यावी.
अंगणवाडी केंद्रातील बालके व इतर लाभार्थी यांना आवश्यक कागदपत्रांसह आधार नोंदणी
केंद्रामध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात. आधार नोंदणीची पावती सांभाळून
ठेवण्याबाबत पालकांना सूचना देण्यात याव्यात. त्याबाबतची नोंद अंगणवाडी केंद्रातील
नोंदवहीमध्ये करण्यात यावी, तसेच संबंधित सर्व अंगणवाडी पर्यवेक्षकांनी त्यांच्या
बीटमधील आधार कॅम्पच्या नियोजनाबाबत जिल्हा समन्वयक यांच्याशी समन्वय साधून
सहकार्य करावे व आधार नोंदणीबाबतचा दैनंदिन अहवाल न चुकता जिल्हा परिषदेच्या महिला
व बालविकास कार्यालयास दररोज सादर करावा, अशा सूचना पत्राद्वारे महिला व बालविकास
विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी दिले आहेत.
*******
No comments:
Post a Comment