इतर मागासवर्गीय महामंडळातील कर्जाची एकरकमी परतफेड करणाऱ्या
थकीत लाभार्थ्यांना व्याजात 50 टक्के सवलत
हिंगोली (जिमाका), दि. 28 : महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या
संपूर्ण थकीत कर्जाचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रकमेत 50 टक्के
सवलत देण्याबाबतची सुधारित एकरकमी योजना दि. 31 मार्च, 2023 पर्यंत लागू करण्यात
येत आहे. त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन कर्ज मुक्त
व्हावेत.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त व विकास
महामंडळ मर्या, जिल्हा कार्यालय : डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला
बाजार, हिंगोली-413513 (दूरध्वनी क्र. 02456-224465) येथे संपर्क साधावा, असे
आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा
व्यवस्थापक एस. एन. झुंजारे यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment