06 June, 2022

शासकीय जिल्हा ग्रंथालयात "शिवस्वराज्य दिन" साजरा

 






शासकीय जिल्हा ग्रंथालयात "शिवस्वराज्य दिन" साजरा

 

             हिंगोली, (जिमाका ) दि.6:   छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखिल भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहेत. राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजे ६ जून १६७४ म्हणजेच  " शिवराज्याभिषेक दिन " होय. या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक झाला होता व शिवाजी महाराज छत्रपती झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस स्वराज्याची , सार्वभौमत्वाची , स्वातंत्र्यांची प्रेरणा देणारा दिवस आहे . ६ जुन हा दिवस " शिवराज्याभिषेक दिन " म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे.

            त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर व मराठीतील विविध ग्रंथांचे प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे करण्यात आले होते. याचे उदघाटन  जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव  यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य , विचार पुस्तकांच्या माध्यमातुन समाजातील सर्व घटकांपर्यत पोहचणे गरजेचे आहेत, असे प्रतिपादन केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

          या वेळी, जेष्ठ साहित्यिक  अशोक अर्धापुरकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष  खंडेराव सरनाईक,  गजानन शिंदे  जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, मिलिंद सोनकांबळे,  रामभाऊ पुनसे,  ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

            ग्रंथप्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका हिंगोली येथे सर्वांकरिता खुले असुन सर्वांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.

000000

 

 

 

No comments: