10 June, 2022

बालकामगार आढळून आल्यास 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

 

बालकामगार आढळून आल्यास 1098 या

 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका) दि. 10 :  14 वर्षाखालील  मुलांना घटनेने शिक्षणाचा मुलभूत अधिकार दिला आहे. याकरिता  राज्यातील 14 वर्षाखालील गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जाते, सर्व लहान मुलांनी शाळेत  शिकून स्वत:चे व त्यायोगे देशाचे भविष्य  उज्ज्वल  करावे, ही त्यामागची  प्रामाणिक इच्छा आहे.

परंतू काही समाजकंटक या कोवळ्या  जीवांना स्वत:चा स्वार्थ जोपासण्याकरिता कामावर ठेवतात यास एकत्रपणे विरोध करुन अशा समाजकंटकाची माहिती कामगार विभागास कळवावी, समाजकंटकाविरुध्द खात्रीशीर कारवाई करुन त्या ग्रस्त मुलांना शालेय शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करुन त्याला भारताचा सुजाण नागरिक बनवू, बालमजुरी ही एक विघातक सामाजिक अनिष्ठ प्रथा आहे, महाराष्ट्रातून बाजमजुरी नष्ट करु असे आवाहन आंतरराष्ट्रीय  बाल मजुरी  विरोधी  दिनाचे औचित्य साधून कामगार आयुक्त सुरेश जाधव यांनी केले आहे.

14 वर्षाखालील  लहान मुले  शाळेत न जाता कुठे  काम करताना आढळून आल्यास तात्काळ  नजीकच्या कामगार विभागास अथवा हेल्पलाईन क्र. 1098 वर कळवावे. असे आवाहनही कामगार आयुक्त सुरेश जाधव यांनी केले आहे.

 

000000

No comments: