नवनिर्मित किनवट अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयाशी
संपर्क साधण्याचे आवाहन
हिंगोली
(जिमाका), दि. 27 : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत सहआयुक्त तथा
उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट जि.नांदेड मुख्यालय
औरंगाबाद या समितीची स्थापना दि. 16 डिसेंबर, 2021 पासून करण्यात आली आहे. या नवनिर्मित
समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यासाठी कार्यालयाचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
कार्यालय
: सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट
मुख्यालय औरंगाबाद, प्लॉट नं. 4, सेक्टर सी-1, टाऊन सेंटर, सारस्वत बँकेजवळ,
सिडको, औरंगाबाद-431003 या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन विजयकुमार कटके,
सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट (मुख्यालय
औरंगाबाद) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
****
No comments:
Post a Comment