तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात
गरीब कल्याण सम्मेलन आणि खरीप मेळावा संपन्न
हिंगोली
(जिमाका), दि. 01 : तोंडापूर येथील कृषि विज्ञान केंद्रात गरीब
कल्याण सम्मेलन आणि खरीप मेळावा दि. 31 मे, 2022 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी माजी खासदार शिवाजीराव माने हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार तानाजीराव
मुटकुळे हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी ॲड. के. के. शिंदे, डॉ. माधुरी माने, संजय
कावडे, डॉ. विष्णू बोंढारे, प्रा. गजानन शिंदे,
वनिता तंबाके यांची विशेष उपस्थिती होती.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा प्रधानमंत्री आवास योजना,
प्रधानमंत्री उज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ
भारत मिशन, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, वन नेशन वन रेशन कार्ड,
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री मुद्रा योजना
या जण कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.
या सर्व योजना लोकसंख्येतील सर्वात गरीब घटकांचा समावेश करतात.
त्यामुळे या कार्यक्रमाला "गरीब कल्याण सम्मेलन" असे नाव देण्यात आले आहे.
या योजनेमुळे नागरिकांचे राहणीमान कसे सुलभ झाले आहे, हे समजून घेणे नाही तर
अभिसरण आणि संपर्कतेची शक्यता शोधणे हा या संवादाचा मुख्य उद्देश आहे, असे प्रधान
मंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.
आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी शासनाच्या विविध जण कल्याणकारी
योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करत लाभार्थ्यांशी संवाद साधला. माजी खासदार शिवाजीराव
माने यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध कल्याणकारी
योजना तळागाळातील लोकांसाठी उपयुक्त ठरत असून वंचित लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ
घेण्याचे आवाहन केले. तसेच उपस्थित महिला बचत गटाच्या सदस्यांना प्रक्रिया
उद्योगाकडे वाटचाल करुन आर्थिक प्रगती करण्याचे आवाहन केले. या उद्योगांचे
प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र येथे नियमित निशुल्क सुरु असतात. त्यांचा लाभ
हिंगोली जिल्ह्यातील महिलांनी व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमात
संबंधित शास्त्रज्ञांनी खरीप पीक लागवड तंत्रज्ञानाबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन
केले.
कृषी तंत्र विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी माने यांनी उपस्थित
महिलांना विविध उद्योगाबाबत प्रशिक्षण घेऊन उद्योग स्थापन करण्याचे आवाहन केले.
यशस्वी उद्योजिका वनिता तंबाके यांनी उपस्थित महिलांना त्यांचे अनुभव सांगून
हिंगोली जिल्ह्यातील महिला बचत गटांना कृषी विज्ञान केंद्रासोबत समन्वय ठेवून
महिला बचत गट कृषी विज्ञान केंद्राशी जोडावेत. तसेच महिलांनी विविध उद्योगांकडे
वाटचाल करुन हिंगोली जिल्ह्यात जास्तीत जास्त महिला उद्योजक निर्माण व्हाव्यात अशी
अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे नोडल अधिकारी अनिल ओळंबे होते. तर कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन विजय ठाकरे आणि राजेश भालेराव यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी
होण्यासाठी राजेश भालेराव, अजयकुमार सुगावे, डॉ. कैलास गीते, सौ. रोहिणी शिंदे,
सौ. मनीषा मंगल, शिवलिंग लिंगे, संतोष हनवते, ओमप्रकाश गुडेवार, गुलाबराव
सूर्यवंशी, प्रेमदास जाधव, आफरीन यांनी अथक परिश्रम घेतले. विश्वास साळुंके,
मुजाहिद सिद्दीकी, दत्तराव बोडके, वारंग्याचे सरपंच ओम कदम, धनंजय सूर्यवंशी,
मारोतराव पवार, गोरखनाथ हाडोळे, मधुबापू अडकिने, पराग अडकिने यांची विशेष उपस्थिती
होती.
या कार्यक्रमासाठी वारंगा,
तोंडापूर, वरुड, चिखली, दाटी, फुटाणा, डोंगरकडा, कान्हेगाव, कांडली, सेलू, चोंडी,
आंबा, दिग्रस कोंढुर, कुरतादि, जांगव्हाण, भाटेगाव, भोसी, आ. बाळापूर, पिंपरी बु ,
पिंपरी खु , पंकन्हेरगाव, सोडेगाव व इतर गावातून महिला व पुरुष शेतकरी बहुसंख्येने
उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment