हिंगोली
येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
योगामुळे
आपले व समाजाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते
-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि.21
: योगामुळे
आपले व समाजाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. योगाचे महत्व कळावे या साठीच आज
सर्व जगात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा करण्यात येत असल्याचे प्रतिपादन
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जिल्हा
प्रशासन, क्रीडा विभाग, नेहरु युवा केंद्र, योग विद्याधाम, पतंजली योग समिती,
जिल्हा योगा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन
कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय
दैने, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक संदीपसिहं
गिल, अपर पोलीस अधीक्षक यशंवत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी,
शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, क्रीडा अधिकारी संजय बेत्तीवार, नेहरु युवा
केंद्राचे युवा अधिकारी आशिष पंत, तहसीलदार नवनाथ वगवाड, नगर परिषदेचे
मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, योग
शिक्षक दत्तात्रय लेकुळे, रत्नाकर महाजन, विठ्ठल सोळंके, रक्षा बगाडिया आदींची
प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पुढे म्हणाले
की, आज दि. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्वच
गावागावापर्यंत व व्यक्तीपर्यंत योग कसे पोहोचता येईल. योगाच्या माध्यमातून संयोग
कसा होईल, संयोगाच्या माध्यमातून आपले आरोग्य कसे चांगले राहील. आपले आरोग्य
चांगले राहत असताना समाजाचे आरोग्य कसे चांगले राहील. त्याअनुषंगाने आंतरराष्ट्रीय
योगदिनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शरीर, मन, आरोग्य स्वस्थ राहण्यासाठी योग अभ्यासात सातत्य
राखण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
योग गुरु रत्नाकर महाजन व विठ्ठल सोळंके यांनी योग
दिनामध्ये सहभाग झालेल्या प्रत्येकाने आपले मित्र व कुटुंबीयांना योगाचे महत्त्व
समजावून सांगावे. तसेच योगाचा प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे
आवाहन केले. तसेच योग दिनानिमित्त त्यांनी उपस्थितांकडून योगविद्येची विविध आसने
करुन घेतली. योग दिनाचा शेवट प्रार्थना आणि संकल्प करत, शांती पठनाने झाला.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आज संत
नामदेव पोलीस कवायत मैदान परिसरात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी
अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्यासह इतर मान्यवरांच्या
हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांच्या हस्ते ओमकाराच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन योग शिबिराचा
शुभारंभ करण्यात आला. या शिबिरास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment