जिल्हा परिषदेच्या 57 व सर्व पंचायत समित्यांच्या 114 जागांच्या
निवडणुकांकरिता
प्रभागाच्या भौगोलिक सीमा निश्चितीचा कार्यक्रम जाहीर
हिंगोली (जिमाका), दि. 03 : राज्य निवडणूक आयोगाच्या
आदेशान्वये दिलेल्या कार्यक्रमांनुसार हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 57
जागा व त्याअंतर्गत असलेल्या सर्व पंचायत समित्यांच्या 114 जागांच्या
निवडणुकांकरिता प्रभागाच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्याबाबतचा कार्यक्रम दिलेला
आहे. त्यानुसार दि. 02 जून 2022 रोजी प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्द
करण्यात येत आहे. ही अधिसूचना महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम
(5) चे कलम 12 पोटकलम (1) अन्वये हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय,
जिल्हा परिषद कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालय, सर्व तहसील कार्यालय, सर्व पंचायत
समिती कार्यालयातील फलकावर पाहण्यासाठी उपलब्ध केलेली आहे.
या
प्रारुप प्रभाग रचनेवर काही हरकती व सूचना असल्यास त्या दि. 02 जून, 2022 नंतूर ते
दि. 08 जून, 2022 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे ग्रामपंचायत
निवडणूक शाखेत सादर करता येतील. तसेच प्रारुप प्रभाग रचनेचे अवलोकन सर्व
संबंधितांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्यातर्फे करण्यात येत
आहे.
****
No comments:
Post a Comment