03 June, 2022

 

तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळवण्यासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु

शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी 6 जून रोजी समाज कल्याण कार्यालयात शिबिराचे आयोजन

            हिंगोली (जिमाका), दि. 03 :  सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्याकडून तृतीयपंथी व्यक्तींसाठी National portal for Transgender persons- https://transgender.dosje.gov.in हे राष्ट्रीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळवण्यासाठी अर्ज करण्याबाबतची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

            या योजनेद्वारे तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सामाजिक जीवनमान उंचावणे तसेच त्यांना मतदान कार्ड, राशन कार्ड, घरकुल योजना, विनामूल्य आरोग्य तपासणी इत्यादी बाबीसाठी शासनाच्या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी  सहायक आयुक्त  समाज कल्याण कार्यालय, हिंगोली येथे दि. 6 जून, 2022 रोजी एक दिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा हिंगोली जिल्ह्यातील तृतीय पंथीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.  

****

No comments: