अनुदान व बीज
भांडवल योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
हिंगोली,
(जिमाका) दि. 20 : साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णा भाऊसाठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय हिंगोली कार्यालयाच्यावतीने
मातंग समाज व 12 पोट जातींना अनुदान योजनेचा व बीज भांडवल योजनेचा बँकेमार्फत लाभ
देण्यासाठी सन 2020-23 या आर्थिक वर्षाचे उदिष्ट प्राप्त झालेले आहे. या योजनांचा
लाभ घेण्यासाठी गरजू लाभार्थ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णा भाऊसाठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, सरकारी दवाखान्याजवळ, हिंगोली येथे संपर्क
साधावा, असे असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
1) अनुदान योजना :- प्रकल्प मर्यादा 50 हजार
रुपयांपर्यंत गुंतवणूक असणाऱ्या रक्कमेमध्ये 10 हजार अनुदान व उर्वरित बँकेचे कर्ज
असणार आहे.
2) बीज भांडवल योजना प्रकल्प मर्यादा 50001 रुपये
ते 07 लाख रुपयांपर्यंत यामध्ये लाभार्थींचा सहभाग 05 टक्के, महामंडळाचे कर्ज 20
टक्के (20 हजार रुपये अनुदानासह) व बँकेचे कर्ज 75 टक्के याप्रमाणे आहे. या योजनेत
स्थिर भाग भांडवल निर्मितीच्या उद्योगाचे कर्ज प्रस्ताव उदा : वाहन, यंत्रे व
मशिनरी खरेदी तसेच इतर विविध व्यवसायासाठी उदिष्टे देण्यात आलेली आहेत.
वरील दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा 18
ते 50 असणे आवश्यक आहे. तसेच जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो 02
प्रती, रेशन कार्ड, आधार कार्ड, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेचा
पुरावा, व्यवसायाचे कोटेशन, अनुभव प्रमाणपत्र, शासकीय योजनेचा लाभ न घेतलेले
प्रमाणपत्र व शौचालय बांधल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, निवडणूक
ओळखपत्र, दुकानाचा परवाना, लायसन्स, बॅच, परमीट व इतर कागदपत्राची आवश्यकता आहे,
असे जिल्हा व्यवस्थापक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), जिल्हा
कार्यालय, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
No comments:
Post a Comment