नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2022
हिंगोली, वसमत व कळमनुरी नगर परिषदेच्या अंतिम प्रभाग रचनेस मान्यता
हिंगोली (जिमाका), दि. 13 : मा. अवर सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे
दि. 27 डिसेंबर, 2021 चे पत्र व मा.सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य
मुंबई यांचे दि. 6 मे, 2022 व दि. 7 जून, 2022 च्या पत्रान्वये हिंगोली नगर परिषद
व वसमत नगर परिषदेच्या प्रभाग रचनेस अंतिम मान्यता मिळालेली आहे. तसेच मा. विभागीय
आयुक्त, औरंगाबाद यांच्या दि. 6 जून, 2022 च्या पत्रान्वये कळमनुरी नगर परिषदेच्या
प्रभाग रचनेस अंतिम मान्यता मिळालेली आहे.
अंतिम प्रभाग रचना नागरिकांना
पाहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तसेच संबंधित नगर परिषदेच्या वेबसाईटवर ,
संबंधित नगर परिषदेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहावयास मिळेल, असे
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment