09 June, 2022

हिवताप प्रतिरोध माह निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

 

हिवताप प्रतिरोध माह निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

 

हिंगोली, (जिमाका) दि.9: राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हिवताप प्रतिरोध महिना जून-2022 या महिन्यात हिवताप व इतर किटकजन्य आजाराविषयी (डेंगू, चिकुनगुनिया, जे.ई. चंडीपुरा, हत्तीरोग इत्यादी) जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन त्याचा प्रतिरोध उपाय योजनेमध्ये सर्वांना सक्रीय सहभागी करुन घेण्याच्या दृष्टीने दरवर्षी विविध उपक्रमाद्वारे हिवताप प्रतिरोध महिना पारेषण काळापूर्वी म्हणजे  जून महिन्यात साजरा करण्यात येतो. या जनजागरण मोहिमेमध्ये गाव पातळीवर हिवतापाची लक्षणे, उपचार व हिवताप प्रतिरोधाच्या विविध उपाय योजनाची माहिती विविध माध्यमाद्वारे पोहचविणे आवश्यक आहे.  डासोत्पती प्रतिबंध उपाय योजनामध्ये सहभाग वाढविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

यामध्ये जलद ताप रुग्ण सर्व्हेक्षण, डासोत्पत्ती स्थानांत गप्पीमासे सोडणे, ग्रामीण आरोग्य पोषाहार व स्वच्छता समितीची सभा, आशा बळकटीकरण, कन्टेनर सर्व्हेक्षण चित्रकला स्पर्धा, हस्त पत्रिका वाटप व एक दिवस कोरडा दिवस पाळणे या विषयी जनतेमध्ये  जनजागृती  निर्माण करण्यात येते.

जनतेने आप-आपल्या घरातील पाणीसाठे झाकूण ठेवावेत. तसेच घरासमोरील नाल्या वाहत्या करणे, खिडक्यांना जाळी बसविणे, संडासच्या व्हॅट पाईपला जाळी बसविणे, झोपताना ओडोमॉसचा वापर करावा. कुलर्स मधील पाणी आठ दिवसाला स्वच्छ करावे, घरासमोर डबकी होऊ देऊ नये, नारळपाणीचे करवट्या तसेच घरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, आपल्या जवळील परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील कोणत्याही व्यक्तीस ताप आल्यास तात्काळ जवळच्या सरकारी दवाखान्यात तपासणीस आणावे. तसेच घराबाहेर निघताना मास्क, ग्लोज व सॅनिटायझरचा वापर करावा, दोन व्यक्तीं बोलतांना त्यांच्यातील अंतर किमान एक मिटरचे असावेत.

 जिल्ह्याअंतर्गत सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक यांचा लोक सहभाग घेऊन गावपातळीवरील सदरील हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात यावा असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड  यांनी केले आहे.

00000

 

No comments: