नर्सी नामदेव येथे समाधान शिबीर संपन्न
हिंगोली, (जिमाका
) दि. 9: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासन आपल्या दारी या
संकल्पनेतून हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे महसूल मंडळ नर्सी ना. , डिग्रस
कराळे, भांडेगाव व हिंगोली या चार मंडळाच्या नागरिकांकरिता आयोजित समाधान योजना
शिबिर दिनांक ०८ जून २०२२ रोजी संपन्न झाले. या शिबीरास जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर, पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, जिल्हा
कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे, तहसीलदार नवनाथ वगवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
बोंढारे, आत्माचे प्रकल्प संचालक सहारे व विविध विभागातील कार्यालय प्रमुख व
त्यांचे अधिनस्त सर्व कर्मचारी उपस्थित होते.
समाधान शिबीरात विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते. सदर
स्टॉलमध्ये नागरीकांना विविध विभागाच्या योजनाबाबत माहिती देण्यात आली. ज्या
सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देणे शक्य आहे त्या सुविधा तेथेच उपलब्ध करून दिल्या.
नागरिकांच्या मागणीबाबत व तक्रारीवर तेथेच समाधान करण्यात आले. स्टॉलमध्ये
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, उपविभागीय अधिकारी
उमाकांत , तहसिलदार नवनाथ वगवाड यांचे हस्ते आपले सरकार सेवा केंद्र व ग्रामपंचायत
मार्फत उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे, वय व अधिवास ,
राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, अल्पभूधारक प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र , नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र , श्रमदान कार्ड असे एकूण 380 दाखले
नागरिकांना वितरित करण्यात आले. उपविभागीय अधिकारी कार्यालय हिंगोली मार्फत
ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नर्सी नामदेव,
डिग्रस कराळे, भांडेगाव व हिंगोली या चार मंडळाची फेरफार अदालत घेण्यात आली असून
फेरफार अदालतीमध्ये 125 फेरफार मंजूर करण्यात आले आहेत. या फेरफार नकला व अद्ययावत
सातबाराचे वितरण नागरिकांना करण्यात आले. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 50
अर्ज मंजूर करण्यात आले असून अर्ज मंजुरी बाबतचे पत्र लाभार्थ्यांना वितरित
करण्यात आले.
तहसील कार्यालयाचे निवडणूक शाखा, पुरवठा शाखा, नैसर्गिक आपत्ती
शाखा , जमीन-१, जमीन-२ शाखा यांचे मार्फत नागरीकांना विविध योजनेची माहिती देण्यात
आली तसेच त्यांचे अर्ज स्विकारण्यात आले. आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी शिबिर
covid-19 , लसीकरण, covid-19 rt-pcr तपासणी करण्यात आली. बालविकास प्रकल्प अधिकारी
कार्यालयामार्फत गरोदर व स्तनदा मातांना पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच त्यांचे विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली.
पंचायत समिती मार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना घरकुल
योजनाबाबत माहिती देण्यात आली व तक्रारीचे निरसन करण्यात आले. ग्रामीण जीवनोन्नती
अभियान अंतर्गत उमेद संस्थेमार्फत बनविण्यात आलेल्या घरगुती वस्तू विक्रीस
ठेवण्यात आल्या. कृषी विभागामार्फत सोयाबीन उत्पादन उगवण क्षमता तपासणी , बीज
प्रक्रिया फवारणी बाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण बँके
मार्फत पीक कर्ज वाटप व इतर योजना बाबत माहिती देण्यात आली. पोलीस विभागामार्फत
दामिनी पथक, जननी अभियान, डायल 112 बाबत मार्गदर्शन करण्यात आले. कामगार
विभागामार्फत कामगारांसाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. भूमी अभिलेख
विभागामार्फत मोजणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अभिलेख पाहणीसाठी
उपलब्ध ठेवण्यात आले. आगार व्यवस्थापक एसटी महामंडळ मार्फत विविध योजनांची माहिती
देण्यात आली. स्वयंसेवी संस्थेमार्फत तरुणांना रोजगार व शेती उपयोगाबाबत ट्रॅक्टर
विषयी माहिती देण्यात आली . वरील स्टॉलला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस
अधीक्षक राकेश कलासागर यांनी भेटी देऊन पाहणी केली.
समाधान शिबिरात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
म्हणाले की, नागरिकांनी समाधान शिबिरात आयोजित केलेल्या विविध योजनांचा लाभ
घ्यावा. जास्तीत जास्त नागरिकांनी शेतीचे उत्पन्न कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न
करावे, नवीन रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावेत, सिंचन क्षमता वाढविण्यासाठी
प्रयत्न करावेत, आधुनिक अवजारांचा उपयोग करून शेतीचे उत्पन्न वाढविणे बाबत त्यांनी
मार्गदर्शन केले. यासाठी प्रशासनाचे सर्व विभाग तत्पर असून नागरिकांना विविध
सुविधा प्रशासनामार्फत देण्यात येतील, असे प्रतिपादन केले .
समाधान शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिविक्षाधीन तहसिलदार हिमालय
घोरपडे, नायब तहसीलदार अनिता वडवळकर, परिविक्षाधीन नायब तहसीलदार नकुल पोळेकर,
तालुका कृषी अधिकारी गोविंद बंटेवाड, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, उपअधीक्षक भूमी
अभिलेख राम सिद्धमवार, बालविकास प्रकल्प अधिकारी राजेश मगर, तालुका आरोग्य अधिकारी
नामदेव कोरडे, अव्वल कारकून संजय घुगे, मंडळ अधिकारी रामधन दराडे, गजानन पारिसकर,
सोनाली अरगडे, संत नामदेव संस्थानचे सचिव सुभाष हुले, सर्व तलाठी तसेच तहसील
कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलाठी
अशोक केंद्रेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी केले.
समाधान शिबिराचा अंदाजे 1200 लोकांनी लाभ घेतला.
000000
No comments:
Post a Comment