15 June, 2022

 

चिल्ड्रन चॅम्पीयन ॲवार्ड पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 15 : चिल्ड्रन चॅम्पीयन ॲवार्ड पुरस्कार बालकांचे शिक्षण, आरोग्य, पोषण, बालसंरक्षण आणि सार्वजनिक सेवा या प्रकारात दिला जातो. या पुरस्कारासाठी https://deper.delhi.gov.in/awards या संकेतस्थळावर आपली ऑनलाईन नामांकने दि. 16 जून, 2022 रोजी  सकाळी 11.59 वाजेपर्यंत सादर करावीत. अधिक माहितीसाठी https://deper.delhi.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी केले आहे.

या पुरस्कारासाठी वैयक्तीक किंवा सामाजिक क्षेत्रात अतुलनीय साहस दाखवून समस्या सोडविण्यास मदत करणारे बालक, बालकांच्या प्रश्नांवर आवाज उठवून त्यांची सोडवणूक करणारे आजी माजी राजकारणी, स्वराज्य संस्था, राज्य तसेच देशपातळीवर काम करणारे राजकीय व्यक्ती, कायदेपंडीत कायद्याचा वापर करुन बालकांचे हितास प्राधान्य देणारे, यामध्ये न्यायधीश, वकील, कायदेशीर सल्लागार किंवा बालकांच्या कल्याणासाठी कायद्याचा आधार घेणारे कुणीही यांचा समावेश होतो. तसेच बालकांच्या प्रश्नांना वर्तमानपत्रातून वाचा फोडणारे, बालकांना होणारा त्रास, गरिबी, बालकांचा दर्जा यासाठी वृत्तपत्रात लिखाण करणारे पत्रकार, न्यूज चॅनेलमध्ये मध्ये काम करणारे पत्रकार, मासिक किंवा नियतकालिकामध्ये नियमितपणे लिहिणारे पत्रकार यांचा समावेश होतो.

बालकांच्या शिकण्याच्या पध्दती, बालकांचा अभ्यासक्रम, बालशिक्षण, मूल्यांकन पध्दती यावर काम करणारे तज्ञ, बालकांच्या कल्याणासाठी CSR फंड चा वापर करणारे उद्यमी, बालकांचे आरोग्य व पोषण यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, वैद्यकीय व्यवसायी यांचा समावेश आहे. बालकांसाठी काम करणारे टीव्ही कलाकार, डांन्सर्स, संगीतकार, गायक, बॅन्ड, पेंटर, चित्रकार, नायक, नायिका, निर्माता, दिग्दर्शक, एन.जी.ओ.,  बालशिक्षणामध्ये काम करणारे तज्ञ, स्पर्धात्मक खेळासाठी बालकांना उत्तेजना देणारे, खेळ व्यावसायिक, खेळाडू, कोच, संशोधक, सनदी सेवक, राजकारणी यांचा समावेश आहे.

सार्वजनिक सेवा यामध्ये सनदी नोकर, राजकारणी, एनजीओ, वकील किंवा वैयक्तीक किंवा संस्थात्मक काम करणारे व्यक्ती, बालकांची जात, वंश, रंग, पंथ, धर्म, लैंगिकता, दिव्यांगता या क्षेत्रात काम करणारे कुणीही पात्र असतील, अशी माहितीही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

****

No comments: