बालकामगार विरोध्दी दिनानिमित्त
प्रत्येक शासकीय कार्यालयांने
विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे
--जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका) दि. 10 : बाल कामगार ही एक अनिष्ट प्रथा असून
समाजातून त्याचे उच्चाटन व्हावे यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत. 12
जून जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त कामगार विभागातर्फे
संपूर्ण राज्यात बालकामगार विरोधी
जन जागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
तसेच दिनांक 13 जून 2022 रोजी प्रत्येक जिल्हा कार्यालयाने त्यांच्या कार्यालयातील
कर्मचारी, अधिकाऱ्यांना बाल कामगार प्रथेविरुध्द संवेदनशील करण्याकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे आणि
जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी घरेलू कामगार म्हणून बाल कामगार ठेवू नयेत,
शासकीय कार्यालयात चहा अथवा इतर कामासाठी बाल कामगारांना प्रतिबंध करावा असे आवाहन
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड यांनी केले
आहे.
000000
No comments:
Post a Comment