महाजीवीका अभियान
अंतर्गत स्वयंसहाय्यता समुहास बँकेच्या वतीने कर्ज
वितरण सोहळ्यात जिल्ह्यातील एकुण १४० महिला बचतगटांना
२ कोटी २५ लाख रुपयाचे कर्ज वाटप
हिंगोली, (जिमाका
) दि. 9: महाजीविका अभियान अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण
जीवनोन्नती अभियानाच्या स्वयं सहायता समूहास विविध बँकेच्या वतीने कर्ज वितरण
सोहळ्याचे आयोजन दिनांक ८ जुन २०२२ रोजी DPDC सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे करण्यात
आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले .
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी शशीकांत सावंत,
आरसेटीचे संचालक, श्री.बोईले, श्री मोरे, HDFC बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा अभियान व्यवस्थापक. जे.व्ही.मोडके, लेखाधिकारी मनोज
पिनगाळे, एम.जी.बी.बॅंकेचे बँक व्यवस्थापक श्री.त्रीपुडे, जिल्हा व्यवस्थापक राजू दांडगे, जिल्हा व्यवस्थापक विक्रम सारस्वत, जिल्हा व्यवस्थापक किरण गुरमे, जिल्हा व्यवस्थापक ओमप्रकाश
गलांडे, तालुका व्यवस्थापक सिद्धार्थ पंडित , रमेश पवार, अनंत मुळे, संतोष बोसकर, दादासाहेब खाडे, अक्षय घावडे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदचे
मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रकल्प संचालक
डॉ. विशाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली हा कर्ज वितरण मेळावा आयोजित करण्यात आला
होता.
महाजीवीका अभियान अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण
जीवनोन्नती अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील १४० स्वयं सहायता समूहास २ कोटी २५
लाख रुपये कर्ज वाटप विविध
बँकामार्फत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जिल्हा अभियान
व्यवस्थापक जे. व्ही. मोडके,
यांनी केले . हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यातून मोठ्या संख्येने बचतगटांच्या
महिला, बँक सखी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात सन २०२१-२२ मध्ये उत्कृष्ट काम
केलेल्या बँक व्यवस्थापक व बँक सखी यांचा
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार जिल्हा व्यवस्थापक किरण गुरमे
यांनी मानले.
000000
No comments:
Post a Comment