अपंग
प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी 15 जुलै पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 30
: राज्याच्या अपंग कल्याण आयुक्तालयामार्फत शासन मान्यता
प्राप्त असलेल्या तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर या संस्थेत महाराष्ट्र
राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई यांची शासन मान्यता प्राप्त असलेल्या अभ्यासक्रमासाठी
15 ते 45 वयोगटातील अपंग व मूकबधीर मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे.
या प्रशिक्षण केंद्रात संगणक प्रशिक्षण (सीसी इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलाजी
आणि कॉम्प्यूटर टायपींग), वेल्डर कम फॅब्रीकेटर, शिवण व कर्तन कला आणि
इलेक्ट्रीशिएन या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येत आहे. या संस्थेत अपंग आणि
मूकबधीर प्रशिक्षणार्थींना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवी
शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे. प्रवेशितांची निवासाची, वैद्यकीय औषधोपचाराची व
प्रशिक्षण साहित्याची विनामूल्य सोय केली आहे.
इच्छूक अपंग मुला-मुलींनी , पालकांनी दि. 15 जुलै, 2022 पर्यंत
प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, शिवनेरी नगर, रामपूर रोड, देगलूर
जि.नांदेड (भ्रमणध्वनी क्र. 9960900369, 9175446411, 7378641136, 9503078767) येथे
संपर्क साधावा व प्रत्यक्ष भेटावे, असे आवाहन कर्मशाळा अधीक्षक, तुळजाभवानी अपंग
प्रशिक्षण केंद्र, देगलूर जि. नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
******
No comments:
Post a Comment