सेनगाव तालुक्यातील रास्तधान्य दुकानदारावर गुन्हा
दाखल करुन
रास्तभाव
दुकानाचा परवाना केला निलंबित
पुरवठा विभागाची कार्यवाही
हिंगोली, (जिमाका ) दि.7: सेनगाव तालुक्यातील मौ. सुकळी व मौ. कवठा बु. येथील
गोरगरीब जनतेसाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून
नियतनाच्या स्वरुपात देण्यात आलेला रेशनचा
गहू व तांदुळ हे गावातील रास्तभाव दुकानदार यांनी खाजगी व्यक्तीद्वारे काळ्याबाजारात
विक्री करिता नेत असताना पोलीस स्टेशन सेनगाव यांनी कार्यवाही करुन धान्य जप्त केले
होते. या कार्यवाहीमध्ये रास्तभाव दुकानदार
यांच्यावर गुन्हा नोंद करुन रास्तभाव दुकानाचा
परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात
आला आहे.
संबंधित रास्तभाव दुकानातील लाभार्थी यांची
अन्नधान्य मिळणेकरिता होणारी गैरसोय टाळण्याकरिता
मौ. सुकळी बु., मौ. कवठा बु., ता. सेनगाव व
मौ. सुकळी खुर्द (पर्यायी व्यवस्था मौ. सुकळी बु.) या गावांची तात्काळ प्रभावाने
पर्यायी व्यवस्था नजीकच्या गावांना करण्यात आलेली आहे. सेनगाव तालुक्यातील सर्व
148 रास्तभाव दुकानदार यांची कालबध्द कार्यक्रमाअंतर्गत सखोल चौकशी करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेशित
केल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी , हिंगोली
यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment