डी.एल.एड
प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी
7
जुलैपर्यंत ऑनलाईन आवेदन सादर करावेत
हिंगोली (जिमाका), दि.23
: प्राथमिक
पदविका (डी.एल.एड.) प्रथम वर्ष या अभ्यासक्रमासाठी सन 2022-23 या शैक्षणिक
वर्षासाठी शासकीय व व्यवस्थापन कोट्यातील जागा भरण्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
सुरु करण्यास पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी
परवानगी दिली आहे.
या अभ्यासक्रमासाठी
इयत्ता बारावीमध्ये खुल्या संवर्गातील विद्यार्थी 49.5 टक्के व इतर संवर्गातील विद्यार्थी 44.50 टक्के
गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी प्रवेश अर्ज शुल्क खुल्या संवर्गातील
विद्यार्थ्यांसाठी 200 रुपये व इतर संवर्गातील विद्यार्थ्यासाठी 100 रुपये ऑनलाईन
भरणे आवश्यक आहे. प्रवेश नियमावली, अध्यापक विद्यालय यादी, वेळापत्रक,
प्रवेशाबाबतच्या सूचना www.maa.ac.in या
संकेतस्थळावरील Important Information मध्ये उपलब्ध आहे.
शैक्षणिक वर्ष 2022-23
मध्ये डी.एल.एड प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.maa.ac.in
या संकेतस्थळावर दि. 7 जुलै, 2022 पर्यंत ऑनलाईन आवेदन सादर करावेत. पडताळणी
अधिकाऱ्यांनी दि. 8 जुलै, 2022 पर्यंत प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करावी व
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,
हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
****
No comments:
Post a Comment