07 June, 2022

महसूल विभागाकडून समाधान शिबिराचे 8 व 13 जून रोजी आयोजन

 

महसूल विभागाकडून समाधान शिबिराचे 8 व 13 जून रोजी आयोजन

             हिंगोली, (जिमाका ) दि.7:   हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे  दिनांक 8 जून, 2022 रोजी नर्सी ना, भांडेगाव, डिग्रस, हिंगोली  या सर्कलसाठी  तर बासंबा येथे  दिनांक 13 जून, 2022 रोजी बासंबा, खानापूर चित्ता, सिरसम बु., कनेरगाव ना.  सर्कलसाठी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या समाधान शिबिरास जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी तसेच सर्व यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

            या शिबिरात संबंधित सर्कल मधील सर्व जनतेला महसूल विभागामार्फत दिले जाणारे सर्व शैक्षणिक  दाखले तसेच इतर विभागातील प्रलंबित  कामकाज व जनतेच्या इतर समस्या समजून त्या सोडविण्याबाबत उचित कार्यवाही करण्यात येणार आहे.

            या  समाधान शिबिरास सर्कलमधील सर्व जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार, हिंगोली यांनी केले आहे.

000000

No comments: